प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा येथे होणाऱ्या नियोजित १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.” घालमोड्या दादांचे संमेलन व आमची भूमिका ” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत निरंजन टकले (नाशिक) यांचे व्याख्यान मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दैवज्ञ सांस्कृतिक भवन, यादव गोपाळ पेठ, सातारा येथे होणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र व शिव, फुले, शाहू, आंबेडकरी संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी चौदाव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर आहेत, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्यावतीने देण्यात आली आहे. व्याख्यानाला पद्मश्री लक्ष्मण माने , प्रा. डॉ. बाबुराव गुरव, एड. सुभाष पाटील, ह. भ. प. डॉ. सुहास फडतरे महाराज, एड. वर्षा देशपांडे , कॉ. धनाजी गुरव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा व्याख्यान कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक कॉ. विजय मांडके, मिनाज सय्यद, आयु. गणेश भिसे, ॲड. राजेंद्र गलांडे, ॲड. दयानंद माने, प्राचार्य डॉ. अरुण गाडे , डॉ. प्रशांत पन्हाळकर व नारायण जावलीकर यांनी केले आहे.