पुणे जिल्हा | लोकसभेपेक्षा विधानसभेचा स्ट्राईकरेट जास्त असेल- योगेंद्र पवार

बारामती, (प्रतिनिधी) – बारामती विधानसभा मतदारसंघात लोकसभेपेक्षा विधानसभेचा स्ट्राईकरेट जास्त असेल, असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
लोकसभेच्या निवडणुकीपासून युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय झाले आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात त्यांचा झंजावात सुरू आहे.
प्रत्येक मंगळवारी ते बारामतीचा दौरा करतात. मंगळवारी (दि. 1) बारामती शहरात ते दौर्यावर असताना त्यांच्याशी संवाद साधत युगेंद्र पवार बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारणा केली त्यावेळी योगेंद्र पवार म्हणाले की, बारामती शहर व तालुक्यात सध्या मी फिरत आहे विविध प्रश्न जाणून घेत आहे. नागरिकांशी संवाद साधत आहे.
बारामतीकरांचा शरद पवार यांना पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी बाबत विचारले असता ते म्हणाले की, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत सर्व्हे करतील त्यानंतर उमेदवारी बाबत निश्चित सांगता येईल.
बारामती शहरात तसेच तालुक्यात देखील विविध प्रश्न भेडसावत आहेत. हे प्रश्न सोडवण्याबाबत नागरिकांशी संवाद साधत आहे.





