मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षाचा वचननामा जाहीर केला. भाजप आणि शिवसेना जरी राज्यात एकत्र निवडणुका लढत असले तरी वचननाम्याबाबत दोन्ही पक्षात एकवाक्यता झाली नाही त्यामुळे आत शिवसेनेकडून त्यांचा स्वतंत्र वचननामा जाहीर करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mumbai: Shiv Sena releases manifesto for the upcoming #MaharashtraAssemblyPolls, 2019. pic.twitter.com/ki5TtHKWzh
— ANI (@ANI) October 12, 2019
सेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्यात 10 रुपयांत जेवण, 1 रुपयांत आरोग्य चाचणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, खेड्यातील मुलांसाठी विशेष वाहतूक सेवा अशी अनेक आश्वासने महाराष्ट्राच्या जनतेस देण्यात आली.शिवसेनेकडून वचननामा जाहीर करताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पक्षाच्या उपनेत्या प्रियंका चर्तुवेदी यांच्यासह काही नेते आणि कार्यकर्तेदेखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान, राज्याच्या तिरोजीवर अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी घेऊनचं हा वचननामा तयार करण्यात आला आहे अें उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
वचननाम्यातील 10 मुद्दे…
1) प्रथम ‘ती’ – आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार
2) युवा सरकार फेलो – राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार
3) विद्यार्थी एक्स्प्रेस – तालुका स्तरावर गाव ते शाळा / महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५०० विशेष बसची सेवा सुरू करणार
4) शेतकऱ्यांचे हित – शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रु. १०,००० प्रतीवर्षी जमा करणार
5) वीज दरकपात – ३०० युनिट पर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार
6) मजबूत ग्रामीण रस्ते – राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण आखणार
7) एक रुपी क्लिनिक – १ रुपयात आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी राज्यभरात ‘१ रुपी क्लिनिक’ सुरु करणार.
8) सन्मान निराधारांचा – निराधार पेन्शन योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार
9) अन्न हे पूर्णब्रह्म – १० रुपयांत सकस जेवणाची थाळी
10) गावातील धार्मिक स्थळांना अनुदान – राज्यातील सर्व गावांमधील पारंपारिक धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन दुरूस्ती व देखभालीसाठी अनुदान देणार