मुंबई : आज सकाळपासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालानुसार जनतेने महायुतीला बहुमत दिल्याचे समजत आहे. या सगळ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणारे नेते यावेळी पिछाडीवर पडले आहेत. कोणते नेते पिछाडीवर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीनंतर बाळासाहेब थोरात 6 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. संगमनेरमध्ये महायुतीचे अमोल खताळ आघाडीवर आहेत. तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांना 1590 मतांची आघाडी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना 6,971 मतं मिळाली आहेत. तर अतुल भोसले यांना 8,461 मतं मिळाली आहेत. तसेच याशिवाय यशोमती ठाकूर, धीरज देशमुख आणि अमित देशमुख हेदेखील पिछाडीवर आहेत.