बच्चू कडू स्पष्टच म्हणाले,’आमची दोन्ही मते…’

Vidhan Parishad Election 2024 । लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आणखी एक मोठी राजकीय लढत दिसून येत आहे. राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीची विशेष बाब म्हणजे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय युद्ध सुरू झाले आहे. या निवडणुकीत रिसॉर्टचे राजकारणही जोरात सुरू आहे. दोन्ही आघाड्या आपापल्या आमदारांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीत अनेक प्रश्न चर्चेत आहेत. महाराष्ट्रात NDA आघाडीला महायुती आणि विरोधी इंडिया आघाडीला महाविकास आघाडी म्हणून ओळखले जाते. मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-यूबीटी (उद्धव ठाकरे) नेते मिलिंद नार्वेकर यांनी मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार हॉटेल ललित येथून बसमधून विधानसभेसाठी रवाना झाले आहेत.अशात या निवडणुकीत मित्र पक्षांची महत्वाची भूमिका बजावणार आहे. अशात प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू नेमक कुणाला मतदान करणार असा प्रश्न चर्चेत आला होता. कारण बच्चू कडू यांनी अनेकदा महायुतीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत. घरचा आहेर दिला होता. मंत्री मंडळ विस्तारावरूनही त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
अशात आता आज विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू म्हणाले,’आमची दोन्ही मते शिंदे गटाला जाणार आहे’ असं म्हणत त्यांनी एका वाक्यात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेमुळे या निवडणुकीत महायुतीचे पारडे चढ होतांना दिसत आहे. तर महाविकास आघाडीचे टेंशन वाढणार आहे.
विधान परिषदेच्या मतदानादिवशी मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गट, भाजप, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत महायुती वरचढ आहे. त्यामुळे उद्या काय निकाल लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
क्रॉस व्होटिंगचा धोका कोणाला?
क्रॉस व्होटिंगचा सर्वात मोठा धोका राष्ट्रवादीच्या आमदाराकडून (अजित पवार) वर्तवला जात असून लोकसभा निवडणूक झाल्यापासून अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास त्याचा बदल आगामी विधानसभा निवडणुकीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो.





