अभिनय, गायक आणि परफॉर्मर असा विविधांगी भूमिका साकारणारी सोफी चौधरी ही आपल्या हेल्थ आणि फिटनेसबाबत खूपच जागृक असते. सोफीने एक्सरसाइज करत असतानाचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती खूपच मेहनत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी सोफीने आपल्या जिममधील एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करत तिने “फायर बेटन टू द साउंड ऑफ माय फेव क्वीन’ अशी पोस्ट लिहिली होती. या व्हिडिओवर काही क्षणातच कॅमेंट येण्यास सुरुवात झाली. यावर काही जणांनी खूपच मेहतन घेत असल्याचे म्हटले. तर “सर्वात सोपा असा वर्कआउट’ अशी काही जणांनी कॅमेंट केली. त्यानंतर तिने आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत “फिटनेस हम सब के लिए बहुत जरूरी है.’ असा सल्ला दिला. यावरून सोफी आपल्या फिटनेसबाबत किती सर्तक असल्याचे दिसून येते.
दरम्यान, सोफी चौधरीने बॉलीवूडसह साउथमधीलही अनेक चित्रपटात काम केले आहे. सोफी आतापर्यत प्यार के साइड इफैक्ट, शादी नं. 1, किडनैप, अगर, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई यासारख्या चित्रपटातून झळकलेली आहे.