व्हिडीओ । …म्हणून त्याने ५ रेस्टॉरंट्सना दिली ३ लाख ६६ हजारांची टीप; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

मॅनहॅटन – करोना विषाणू संकटामुळे अनेक व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यातील एक महत्वाचा व्यवसाय म्हणजे हॉटेलिंग. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या करोना विषाणूला रोखण्यासाठी जगभरात विविध ठिकाणी निर्बंध घालण्यात आले. यामुळेच ग्राहकांनाफूड सर्व्हिस देणारे व्यवसाय देखील कित्येक महिने बंद होते. करोना अद्याप समूळ नष्ट झाला नसला तरी आता आवश्यक खबरदारी घेत हळूहळू सर्वकाही पुन्हा एकदा सुरु केलं जातंय. मात्र तरी देखील हॉटेल व्यवसाय अद्यापही पूर्वपदावर आला नसल्याचंच चित्र आहे.     

अशातच, अडचणीत सापडलेल्या हॉटेल चालकांना मदत करण्यासाठी एक युट्युबर सरसावला असून त्याने रेस्टोरंट चालकांना मोठी मदत देखील केलीये. युनायटेड स्टेट येथील मॅनहॅटन येथील रहिवाशी असलेल्या एरी स्मिथ उर्फ XiaoMaNYC याने त्याच्या आवडीच्या ५ चायनीज रेस्टोरंटना प्रत्येकी १ हजार डॉलरची (७३ हजार) मदत केली आहे.

एरीने मदत केल्यानंतर रेस्टोरंट चालकांच्या चेहऱ्यांवर उमटलेले भाव आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत. मदत मिळाल्यानंतर हॉटेल चालकांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद टिपणारे हे व्हिडीओ त्याने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

एरीने पोस्ट केलेले हे व्हिडीओ व त्याने अडचणीच्या काळात इतरांना केलेली मदत यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलाच डोक्यावर घेतलंय. एरीने ५ रेस्टोरंटना एकूण ५ हजार डॉलर म्हणजेच ३ लाख  ६६ हजार इतकी मदत केलीये. त्याने हे व्हिडीओ १२ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या चायनीज नववर्षाच्या मुहूर्तावर टिपले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.