मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ‘अमृता फडणवीस’ बँकर असल्या तरी त्या गायिका म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहेत. राजकीय विषयांवर टीप्पणी कऱणाऱ्या अमृता फडणवीस सोशल मीडियावर गायणामुळे सतत चर्चेत असतात. नुकतंच त्यांचं एक नवीन गाणं प्रदर्शित झालं असून, या व्हिडिओला आठ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
“शिवतांडव स्रोत’ असं हे अमृता यांच्या आवाजातील गाणीव गाणं आहे. महाशिवरात्रीचं औचित्य साधत अमृता फडवणीसांनी त्यांच्या आवाजातील हे शिवतांडव स्तोत्र प्रदर्शित केलं आहे. गाण्यात अमृता फडणवीस यांचा जबरदस्त लूक दिसत आहे.
भगवी वस्त्रं, रुद्राक्षांची आभूषणं असा पेहराव त्यांनी केला आहे. तर, दुसरीकडे गाण्यात व्हीएफक्सवर मोठा भर दिल्याचे दिसून आले आहे. या शिवतांडव स्तोत्राला शैलेश दाणी यांनी संगीतबद्ध केलं असून प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्हिडीओचं दिग्दर्शन केलं आहे.