VIDEO : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा पुन्हा चर्चेत; लपूनछपून लंच डेटसाठी आले एकत्र

Rashmika Mandanna And Vijay Deverakonda | साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून तिचे नाव विजय देवरकोंडासोबत जोडले जात आहे. यातच आता सोशल मीडियावर रश्मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात विजय देवरकोंडा देखील पाहायला मिळाल्याने दोघांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये रश्मिका मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसली. तेव्हा विजय देवरकोंडा देखील मागून रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसला. रेस्टॉरंटमध्ये यांची लंच डेट प्लान होती. मात्र या डेटला दोघेही वेगवेगळे पोहचले. लंच डेटसाठी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना दोघेही कूल लूकमध्ये पाहायला मिळाले. रश्मिकाने क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली होती. तर विजयने प्रिंटेड व्हाइट शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती.
दोघांनीही कॅप घातली होती. यावेळी रश्मिकाने तोंडाला मास्क लावले होते. रश्मिकाने नंतर पापाराझींसाठी पोज दिली. मात्र विजय देवरकोंडा तोंडाला मास्क लावून निघून गेला. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लंच डेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
रश्मिका आणि विजयने ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ हे चित्रपट एकत्र केले होते. त्यांची ऑन-स्क्रिन केमि प्रेक्षकांना खूप आवडली आणि तेव्हापासूनच त्यांच्या नात्याची चर्चा आहे. अनेकदा ते दोघे एकत्रही पाहायला मिळाले. मात्र अद्याप त्यांनी अधिकृतपणे त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही.
रश्मिकाच्या ‘छावा’ चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर ती सलमान खानसोबत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ चित्रपटात दिसत आहे. याशिवाय रश्मिका तिच्या आगामी ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटावर देखील काम करत आहे. राहुल रवींद्रन दिग्दर्शित हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे.
हेही वाचा:





