#Video : सोशल मिडियावरून दहशत निर्माण करणाऱ्या ‘यमभाई’ची पोलिसांनी काढली धिंड

Updated On:
#Video : सोशल मिडियावरून दहशत निर्माण करणाऱ्या ‘यमभाई’ची पोलिसांनी काढली धिंड

पिंपरी (प्रतिनिधी) – सोशल मिडियावरून वेगवेगळ्या आकाराच्या कोयत्यांचे प्रदर्शन करीत दहशत निर्माण करणाऱ्या यम भाई याची पोलिसांनी त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातून धिंड काढली. तपासाच्या नावाखाली त्याला हातात बेड्या घालून गुरुवारी (दि. 15) फिरविण्यात आले.

मयुर अनिल सरोदे (वय 21, रा. दुर्गानगर, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या स्वयंघोषित भाईचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील पोलीस नाईक विजय दत्तात्रय तेलेवार यांनी बुधवारी (दि. 14) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात, असे सोशल मिडियावर सांगणाऱ्या यमभाई ऊर्फ कोयता मॅन याला बुधवारी पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांच्याकडून कोयता हस्तगत करण्यात आला. दरम्यान तपासाकरिता आरोपी सरोदे याला पोलिसांनी तो राहत असलेल्या दुर्गानगर परिसरातून हातात बेड्या घालून फिरविले. आरोपी सरोदे याची परिसरात दहशत असल्याने नागरिक घरातून पडद्याआडून त्याची पोलिसांनी काढलेली ही धिंड पाहात होते.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Abhishek Barne: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत लाकूड मिळणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती

2026-09-21 08:45:10

Abhishek Barne: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत लाकूड मिळणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल प्रकरणात 5 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार

2026-09-21 08:33:37

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल प्रकरणात 5 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार

SARTHI: सारथीच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - अनिल पवार

2026-09-21 07:57:58

SARTHI: सारथीच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - अनिल पवार

Pimpri Chinchwad : सामान्य प्रशासनाचा कारभार उपायुक्तांकडे

2026-09-20 10:14:08

Pimpri Chinchwad : सामान्य प्रशासनाचा कारभार उपायुक्तांकडे

Photography-Videography: जनसंपर्काच्या खर्चाचा ‘चौपट’ चढ; फोटोग्राफी-व्हिडिओग्राफीचा खर्च २० लाखांवरून ७४ लाखांवर

2026-09-20 09:53:02

Photography-Videography: जनसंपर्काच्या खर्चाचा ‘चौपट’ चढ; फोटोग्राफी-व्हिडिओग्राफीचा खर्च २० लाखांवरून ७४ लाखांवर