VIDEO: मध्य प्रदेशमध्ये उधमपूर-दुर्ग एक्स्प्रेसला भीषण आग; प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये उधमपूर-दुर्ग एक्सप्रेसला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेने  खळबळ उडाली. अद्याप आगीमागील कारण अस्पष्ट आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हेतमपूर रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर अचानक रेल्वे डब्यात आग लागली. या रेल्वेच्या ए१ (A1) आणि ए२ (A2) कोचमध्ये आग लागल्याने ही घटना घडली. यानंतर तात्काळ रेल्वेतील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

आगीनंतर ही रेल्वे तातडीने थांबवण्यात आली. तसेच रेल्वेतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. रेल्वेचा पुढील भाग गाडीच्या इतर भागापासून वेगळा करण्यात आला. याशिवाय या मार्गावरील इतर सर्व रेल्वे वेळापत्रकानुसारच मार्गक्रमण करत आहेत. या आगीत अद्याप कुणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवम शर्मा यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.