मुंबई – बॉलीवूडची दिलबर गर्ल म्हणजेच अभिनेत्री ‘नोरा फतेही’ने आपल्या मेहनतीमुळे बॉलीवूडमध्ये स्वतःचे असे एक वेगळं स्थान मिळवले आहे. नोरा फतेहीच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. याच कारणामुळे अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सचीही मोठी यादी असल्याचं पाहायला मिळत आहे. डान्सिंग दिवा नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असून सर्वच जण अभिनेत्रीच्या डान्सचे दिवाने झाले आहेत. म्हणूनच नोराच्या सगळ्याच स्टेप्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात.
नुकतंच तिचा आणखी एक व्हिडिओ सोशलवर धुमाकूळ घालत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, आता व्हिडिओ मुळे अभिनेत्री चांगलीच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नुकतंच नोरा फतेहीने फिफा विश्वचषक 2022 मध्ये भारतातचं प्रतिनिधीत्व करत “लाइट द स्काई अँथम’ या गाण्यावर परफॉर्म केलं.
यावेळी डान्स परफॉर्मन्सनंतर नोरा फतेहीने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. तसेच प्रेक्षकांनी देखील तिच्या सोबत जय हिंदीच्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, यावेळी तिच्याकडून एक चूक झाली आहे. ज्यावर नेटकरी तिच्यावर टीका करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
यावेळी उत्साहाच्या भरात अभिनेत्रीने तिरंगा उलटा पकडला होता. ज्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. तिने तिरंगा उलट दिशेने म्हणजे हिरव्या रंग सर्वात वर असलेल्या दिशेने पकडला होता. एवढंच नाही तर तिरंगा उचलत असतानाही चुकीच्या पद्धतीने उचलेला या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, नोराचं हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही आणि त्यावरून आता तिला नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नोराने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. या यादीत ‘स्ट्रीट डान्सर 3डी’, ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘बाटला हाउस’ सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे, ज्यामध्ये नोराने अभिनय कौशल्य दाखवले होत. नोरा फतेही अभिनयाच्या जगात काही खास करू शकली नसली तरी तिच्या डान्सचे इंडस्ट्रीत सगळेच दिवाने आहेत.