मुंबई – सोशल मीडियावर नेहमीच अभिनेत्री ‘हेमांगी कवी’ आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सोशलवर तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, हेमांगीला सोशलवर शेअर केलेल्या पोस्टमुळे कधी नेटकऱ्यांकडून दाद मिळते तर कधी तिच्यावर टीकाही केली जाते. मात्र, आपल्यावर सतत टीका करणाऱ्यांना हेमांगी कवीनं आता सडेतोड उत्तर दिल आहे. नुकतंच तिने या संदर्भातील एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केला आहे.
या व्हिडीओत तिनं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडींग असलेलं एक रील बनवलं आहे. यात दोन व्हिडीओ असून हेमांगीनं डाव्या बाजुच्या व्हिडीओला लिहिले आहे की ‘ही काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते.’ तर उजव्या बाजुच्या व्हिडीओत लिहिले आहे की ‘प्रसिद्धी मिळावी म्हणून ही काहीही करते.’ हेमांगीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
View this post on Instagram
तसेच हेमांगीनं या व्हिडिओ एक कॅप्शन देखील दिल आहे, “इंडस्ट्रीतील काही लोकांच्या, माझ्या कुटुंबातील काही लोकांच्या, काही खास मित्र-मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, तसंच ट्रोलर्स आणि द्वेष करणाऱ्या सगळ्यांसाठी…अलग से.!” या आशयाचे कॅप्शन तिने दिल आहे.