मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान याचा नुकताच वाढदिवस झाला. यंदाचा त्याचा वाढदिवस जास्त चर्चेत राहिला कारण त्याला झालेल्या सर्पदंशामुळे. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही भाईजानने त्याचा ‘बर्थ डे’ पनवेलच्या फार्महाउसवर जाऊन साजरा केला. वाढदिवस साजरा केल्यानंतर आता सलमान पनवेलमध्ये चक्क रिक्षा चालवताना दिसत आहे. पण रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सलमान खानला ट्रोल केले जात आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमानचा पनवेलमध्ये रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच सलमान रिक्षा चालवत आहे हे पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे देखील दिसत आहे. पण या व्हिडीओमुळे सलमानला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
सलमानचा रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने हा व्हिडीओ पाहून ‘आता कुणाला उडवणार आहेस’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘सगळेजण बाजूला व्हा. मला फार्महाऊसवर जायचे आहे… त्या सापाला मारायचे आहे’ अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर तिसऱ्या एका यूजरने ‘भाई मला कतरिनाच्या घरापर्यंत सोडून ये’ असे कमेंट करत म्हटले आहे.
वाढदिवसाच्या आधी सलमानला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर सर्पदंश झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.