नवी दिल्ली – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र स्क्रीनपासून दूर गेले आहेत आणि ते आपला वेळ फार्महाऊसमध्ये घालवतात.
धर्मेंद्र सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहेत फार्महाऊसवरून वेगवेगळे व्हिडीओ ते आपल्या चाहत्यांसाठी शेअर करतात. असा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून, सध्या त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र हे सायकल चालवताना दिसत आहेत. या सायकलच्या चक्राला एक गिरणी जोडलेली दिसत आहे. यात धान्य ठेवण्यात आले असून ते याद्वारे दळत
असल्याचे दिसत आहे. धर्मेंद्र स्वत: हे धान्य दळताना दिसत आहे. तसेच, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आरोग्याबद्दल संदेश सुद्धा दिला आहे.