VIDEO : आधार लिंक करायला उशीर.. संतापलेल्या महिलेच्या अंगात आली देवी;थेट सरकारलाच दिला शाप

मुंबई – जागरण गोंधळ कार्यक्रमात किंवा यात्रेत एखाद्या महिलेच्या अथवा पुरुषाच्या अंगात आल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. मात्र आधार कार्ड लिंक न झाल्याने एखाद्या योजनेचा लाभ न मिळाल्याने महिलेच्या अंगात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.
सदर महिला ‘लाडली बहना योजने’चा लाभ घेण्यासाठी बँकेत आली होती. मात्र आधार लिंक नसल्यामुळे महिलेला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उशीर झाला. मग काय.. महिलेने थेट बँकेतच तांडव सुरु केला. यावेळी महिलेने अंगात देवी आल्याचे दाखवत थेट बँकेतच गोंधळ घालायला सुरुवात केली. आरडाओरडा करत महिला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गोल गोल फिरत गेली. केस मोकळे सोडून जोर जोरात ओरडू लागली. यावेळी महिला थेट सरकारलाच शाप देत जोर जोरात बोलू लागली.
मध्य प्रदेशातील हा सर्व प्रकार असल्याचे समजते. येथील सरकारने लाडली बहना योजना राबवली होती. या योजनेची माहिती देणारा शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते महिलांसाठी ही योजना लाभदायी असल्याचे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या व्हिडिओला उत्तर म्हणून या बँकेतील महिलेचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याचे समजते.
बैंक में आधार लिंक ना होने से लाडली बहना योजना में देरी होने से 😂😂 देवी आ गई और सरकार को श्राप दिया😂 https://t.co/eJijblc3nD pic.twitter.com/F2rBzC803s
— MP Youth Congress (@IYCMadhya) June 5, 2023
लाडली बहना योजनेसाठी आधार लिंक करण्यासाठी अडचणी येत आहेत हे दाखवून देण्यासाठी बँकेतील या चिडलेल्या महिलेचा व्हिडीओ मध्यप्रदेश युथ काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी देखील या व्हिडिओचा पुरेपूर आनंद घेत यावर कमेंट करताना दिसत आहेत.





