Pravin Tarde: ‘शेती विकायची नसते… ती राखायची असते’ असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. नुकतंच प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून, यामध्ये प्रवीण आणि त्यांचे वडील विठ्ठल तरडे यांच्या सोबत शेतात भात लावणी करताना दिसू येत आहे. यावेळी प्रवीण तरडे यांना ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी यांनी देखील हातभार लावला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत. प्रवीण यांच्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. आणि म्हणनूच प्रवीण हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत. लवकरच प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.