VIDEO : “मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही…” ; ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध

Updated On:

Thackeray group Dussehra gathering :  राज्यात गेल्यावर्षीपासून दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावं, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरु आहेत. यंदाही तोच प्रकार झाला मात्र अखेर मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला शिवतीर्थ मैदानात सभा घेण्याची परवानगी दिली. दरम्यान, आता दोन्ही गटाकडून या मेळाव्याचे टिझर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आज ठाकरे गट गटाकडून पहिला टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

येत्या २४ ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थ मैदानावर पार पडणार आहे. याबाबतचा नवा टीझर ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे कुणाला लक्ष्य करणार? याचा अंदाज लावता येत आहे. या टीझरमधून ठाकरे गटाने शिंदे गटाला जोरदार लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

या टीझरमध्ये अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा शिंदे गटाचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला आहे. शिवाय “मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही” असा संदेशही या टीझरमधून देण्यात आला आहे.

“काहीजण पळून जाणारे असतात.. शेपूट घालून बसणारे असतात.. स्वार्थासाठी इमान विकणारे असतात.. शत्रूंशी हात मिळवणारे असतात.. खाल्या ताटात थुंकणारे असतात.. खोक्यापायी विकले जाणारे असतात.. रात्रीच्या अंधारात गद्दारी करून घर फोडणारे असतात.., पण मर्द विकला जात नाही.. मर्द गद्दारी करत नाही.. मर्दांचं एकच ठिकाण… शिवतीर्थ दादर.. एक नेता, एक विचार आणि एक मैदान.. दसरा मेळावा.. मर्दांचा मेळावा..,” असं ठाकरे गटाच्या टीझरमध्ये म्हटलं आहे.

मुंबईच्या दादर येथील शिवतीर्थ मैदानावर ठाकरे गटाचा ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने ठाकरे गटाने तयारी सुरू केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

PCMC Waste Management: मोशी कचरा डेपोचा भार कमी होणार! शहरात उभारणार हायटेक 'ट्रान्स्फर स्टेशन्स; पालिकेचा मास्टरप्लॅन तयार

2026-09-14 02:00:52

PCMC Waste Management: मोशी कचरा डेपोचा भार कमी होणार! शहरात उभारणार हायटेक 'ट्रान्स्फर स्टेशन्स; पालिकेचा मास्टरप्लॅन तयार

Mumbai Rain : मुंबईत पावसाची हजेरी.! हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

2026-09-13 19:07:37

Mumbai Rain : मुंबईत पावसाची हजेरी.! हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

Indonesian : इंडोनेशियाचे प्रवासी जहाज बुडून १३० बेपत्ता; १०७ जणांना वाचवण्यात यश

2026-09-13 19:01:52

Indonesian : इंडोनेशियाचे प्रवासी जहाज बुडून १३० बेपत्ता; १०७ जणांना वाचवण्यात यश

Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजावर हल्ला, एक ठार

2026-09-13 18:47:05

Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजावर हल्ला, एक ठार

Sunetra Pawar: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होणार? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिले कडक निर्देश

2026-09-11 06:00:51

Sunetra Pawar: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होणार? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिले कडक निर्देश