VIDEO : राहुल गांधी समजून शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने वीर सावरकरांच्या छायाचित्रावर…

Updated On:

पुणे – भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. सत्ताधारी शिंदे गट व भाजपने राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतलीये. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील सारसबागेसमोरील स्वा. सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

मात्र शिंदे गटातील एका महिला कार्यकर्त्याचा आंदोलनादरम्यान गोंधळ उडाल्याचं दिसून आलंय. आंदोलनादरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक पोस्टर छापलं होत. यावर वरच्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकर तर खालच्या बाजूला राहुल गांधी यांचा फोटो होता. घोषणाबाजी झाल्यानंतर एक महिला कार्यकर्त्या राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्यासाठी पुढे आल्या.

मात्र यावेळी नेमके राहुल गांधी कोण व स्वातंत्रवीर सावरकर कोण यामध्ये गफलत झाल्यानं या महिला कार्यकर्त्याने सावरकरांचा फोटो असलेल्या दिशेस चप्पल उगारली. मात्र एका पुरुष कर्यकर्त्याने प्रसंगावधान दाखवत वेळीच महिलेचा हात पकडून रोखल्याने हा अनर्थ टळला. मात्र हा सर्व प्रकार कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय.

नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ…

आणखी संबंधित बातम्या

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

2026-10-06 21:59:12

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

2026-10-05 22:33:48

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

2026-10-05 18:22:37

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

Newasa News : विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर

2026-10-05 17:12:54

Newasa News : विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर