रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेतील अंतिम सामना विदर्भ विरुद्ध केरळ असा झाला. या सामन्यात विदर्भाने केरळवर एकतर्फी विजय मिळवत रणजी ट्रॉफीवर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले. या सामन्यात करुण नायरच्या खेळीमुळे विदर्भाला हा विजय मिळवणे शक्य झाला. दोन्ही संघातील हा सामना अनिर्णित राहिला. मात्र विदर्भ पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजेता ठरला. विदर्भाने याआधी 2017-2018, 2018-2019 आणि 2024-2025 असे ३ वेळा रणजी ट्रॉफी खिताब जिंकला आहे. विशेष म्हणजे विदर्भाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर केरळने टॉस जिंकून विदर्भाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विदर्भाने पहिल्या डावात 379 धावा केल्या. विदर्भासाठी दानिश मलेवार याने सर्वाधिक 153 धावांचं योगदान दिलं. तर करुण नायर याने 86 धावा केल्या. केरळकडून एमडी निधीश आणि ईडन ऍपल टॉम या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर बासिल याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जलज सक्सेन याने 1 विकेट घेतली. तर केरळला विदर्भाच्या 379 धावांच्या प्रत्युत्तरात 342 धावाच करता आल्या.केरळकडून कॅप्टन सचिन बेबी याने सर्वाधिक धावा केल्या. सचिन बेबी याचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. सचिनने 98 धावा केल्या. तर आदित्य सरवटे याने 79 धावांचं योगदान दिलं. विदर्भाकडून दर्शन नळकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे या त्रिकुटाने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर यश ठाकुर याने 1 विकेट घेतली. केरळला 342 धावावंर रोखल्याने विदर्भाला 37 धावांची आघाडी मिळाली होती. याच आघाडीच्या जोरावर विदर्भाने केरळवर मात करत तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचा खिताब जिंकला. विदर्भ प्लेइंग इलेव्हन : अक्षय वाडकर (कर्णधार आणि विकेटकीपर), ध्रुव शौरे, दानिश मलेवार, करुण नायर, यश राठोड, अक्षय कर्णेवार, हर्ष दुबे, पार्थ रेखाडे, नचिकेत भुते, दर्शन नळकांडे आणि यश ठाकूर. केरळ प्लेइंग इलेव्हन : सचिन बेबी (कर्णधार), अक्षय चंद्रन, रोहन कुन्नम्मल, जलज सक्सेना, मोहम्मद अझरुद्दीन (विकेटकीपर), सलमान निझार, अहमद इम्रान, ईडन ऍपल टॉम, आदित्य सरवटे, एमडी निधीश आणि नेदुमनकुझी बेसिल.