विकी कौशल ‘सरदार उधम सिंग’च्या शूटिंगसाठी अमृतसरमध्ये दाखल, सुवर्णमंदिराला दिली भेट

मुंबई – ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने त्याच्या आगामी ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमृतसरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाचं लंडन येथील शुटिंगही पूर्ण झाल आहे. आता अमृतसरमध्ये या चित्रपटाचे दुसरे शूटिंग शेड्यूल पूर्ण होणार आहे. विकीने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.
या चित्रपटाची संपूर्ण टीम अमृतसरमध्ये दाखल झाली आहे. अमृतसरमध्ये पोहोचल्यावर विकीने सर्वात आधी सुवर्णमंदिराला भेट दिली. त्याने त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिग्दर्शक सुजित सरकार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, सरदार उधम सिंग हे स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक होते. जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जबाबदार असणाऱ्या मिशेल ओ डायर यांची हत्या त्यांनी केली होती. त्यांची शौर्यगाथा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.





