शमशेरा कसा वाटला ? अभिनेता विकी कौशलने दिले हे उत्तर..

मुंबई – रणबीर कपूर चार वर्षांनंतर शमशेरासोबत मोठ्या पडद्यावर परतला आहे. शमशेरापूर्वी रणबीर 2018 मध्ये रिलीज झालेल्या संजय दत्तच्या बायोपिक ‘संजू’मध्ये दिसला होता. शमशेरा हा शुक्रवारी रिलीज झाला. ज्यामध्ये अभिनेत्याने दुहेरी भूमिका साकारली होती. शमशेरामध्ये रणबीर कपूरसोबत वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. रणबीर कपूरचा शमशेरा रिलीज झाल्यानंतर अभिनेता आणि संजूमध्ये रणबीर कपूरचा सहकलाकार असलेला विक्की कौशलही हा चित्रपट पाहण्यासाठी आला होता. चित्रपट पाहून विकी कौशल बाहेर येताच त्याला चित्रपटाबद्दल त्याचे मत विचारले.
‘त्याला शमशेरा कसा आवडला?’ असे विचारले असता, विकीने हावभावात उत्तर दिले आणि सांगितले की त्याला चित्रपट आवडला. थम्स अप करत त्याने शमशेराला पसंती दर्शवली. यादरम्यान विकी निळ्या जीन्ससह ओव्हरसाईज हुडी घातलेला दिसला.
तर दुसरीकडे शमशेराला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट तज्ञांना अपेक्षा होती की चित्रपटाचा व्यवसाय शनिवार आणि रविवारी वाढेल, परंतु, चित्रपटाने 2 दिवसांत थोडीशी वाढ दर्शविली. चित्रपटाने शनिवारी 10.50 कोटींची कमाई केली, तर पहिल्या दिवशी शमशेराचे कलेक्शन 10.25 कोटी रुपये होते. म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कमाईत केवळ 25 लाखांची वाढ झाली आहे.
View this post on Instagram
चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे तर हा चित्रपट आतापर्यंत केवळ 20.75 कोटींचा व्यवसाय करू शकला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, ‘शमशेरा’ चित्रपट दक्षिण भारतात तितकी कमाई करू शकला नाही. 2 तास 28 मिनिटांचा हा चित्रपट शमशेरा आणि बल्लीभोवती फिरतो. त्याचबरोबर या चित्रपटात संजय दत्त ‘शुद्ध सिंह’ खलनायकाच्या भूमिकेत आहे आणि वाणी कपूरही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.





