‘छावा’ चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर आले समोर, विकी कौशल म्हणाला, ‘344 वर्षानंतर आम्ही…’,

Chhaava Movie Release Date: अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले.
‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले होते. आता चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. नवीन पोस्टरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल सिंहासनरूढ झालेले दिसत आहे. संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन समारंभाचं औचित्य साधत शेअर केलेले हे पोस्टर चाहत्यांना खूपच आवडले असून, यूजर्सकडून सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
View this post on Instagram
चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत विकी कौशलने लिहिले की, ‘16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने एका महान वारशाससुरुवात झाली. 344 वर्षांनंतर आम्ही त्यांच्या अतुलनीय धैर्याची आणि गौरवाची कहाणी घेऊन येत आहोत.’
पोस्टर शेअर करतानाच विकी कौशलने चित्रपटाच्या ट्रेलर आणि रिलीजची तारीख देखील जाहीर केली. चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर 14 फेब्रुवारीला ‘छावा’ चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या, तर अभिनेता अक्षय खन्ना हा औरंगजेबच्या भूमिकेत दिसेल.





