Actress Passed Away : सिनेसृष्टीतील तेजस्वी तारा हरपला ! ‘ही’ ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर सात दशकांहून अधिक काळ निर्विवाद अधिराज्य गाजवणाऱ्या एका दिग्गज (Actress Passed Away) पर्वाचा अखेर अनपेक्षितपणे अंत झाला आहे.

Actress Passed Away : दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर सात दशकांहून अधिक काळ निर्विवाद अधिराज्य गाजवणाऱ्या एका दिग्गज (Actress Passed Away) पर्वाचा अखेर अनपेक्षितपणे अंत झाला आहे.
ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री ‘सौकार’ जानकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले. वयोमानानुसार उद्भवलेल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना चेन्नईतील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून त्या अतिदक्षता विभागात जीवन-मृत्यूची झुंज (Actress Passed Away) देत होत्या, मात्र शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ५९ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. दाक्षिणात्य कलाकारांची संघटना ‘नादिगर संगम’चे अध्यक्ष व अभिनेते नासर यांनी या दुःखाद वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चेन्नईतील तेनमपेट, सेंटोफ रोड येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
शंकरमांची जानकी असे मूळ नाव असणाऱ्या या महान अभिनेत्रीने १९५० मध्ये ‘शावुकारू’ या तेलुगू चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आणि याच पहिल्या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर त्यांच्या नावाला कायमचे ‘सौकार’ हे मानाचे बिरुद जोडले गेले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा प्रमुख दाक्षिणात्य भाषांमधील ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटवत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले. तमिळ सिनेसृष्टीत त्यांनी साकारलेल्या ‘वलैयापथी’, ‘पुथिया परवई’, ‘इधिर नीचल’, ‘इरु कोडुगल’ आणि ‘थिल्लू मुल्लू’ यांसारख्या चित्रपटांतील भूमिका आजही मैलाचा दगड मानल्या जातात.
केवळ चित्रपटच नव्हे, तर रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अफाट प्रतिभेची चुणूक दाखवत ३०० हून अधिक नाटकांचे प्रयोग गाजवले. अभिनय क्षेत्रातील या अतुलनीय आणि प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने २०२२ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या जाण्याने भारतीय कलाविश्वात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी (Actress Passed Away) निर्माण झाली आहे.






