ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, पुण्यातील घरात आढळला मृतदेह
Updated On:

पुणे – मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ते 77 वर्षांचे होते. मावळ तालुक्यात आंबी या गावी एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत ते आढळले. फ्लॅट मधून दुर्गंधी येत असल्याने लोकांनी पोलिसांना कळवले. फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ते मृतावस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. भाड्याने फ्लॅट घेऊन ते एकटेच तेथे राहात होते.
बातमी अपडेट होत आहे.





