वेटणेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण

बुध – वेटणे, ता. खटाव येथील ग्रामपंचायत लिपिक व शिपाई संतोष यादव या कर्मचाऱ्यास गावातील ग्रामस्थाने मारहाण करून अपमानित केले. तसेच तू काय माझे करणार आहे करून घे, मी तुझ्यासारखी पूरून उरलो आहे, अशी धमकी दिली असून त्यामुळे संबंधित कर्मचारी व त्याचे कुटुंब भयभीत झाले आहे. त्यांना संबंधित व्यक्तीपासून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

याप्रकरणी पुसेगाव पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली आहे. पुढे तक्रारीत म्हटले आहे की, काम करताना मला भीतीचे सावट निर्माण झाले आहे. तसेच सदर मारहाण करणाऱ्या व्यक्तींना येत्या एक-दोन दिवसात अटक न केल्यास महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सातारा जिल्हा व खटाव तालुका यांच्यावतीने दुष्काळामध्ये खटाव तालुक्‍यांमध्ये सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बंद करण्याच्या पवित्र्यात असल्याची माहिती तालुक्‍याचे अध्यक्ष गणपतराव फडतरे यांनी दिली आहे. तरी प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here