Tirupati: शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या वाहनांना तिरूपती मंदिर परिसरात प्रवेश नाहीच; पुन्हा एक व्हिडीओ समोर

Updated On:

तिरूमला – देशभरातून दरवर्षी लाखो भाविक हे आंध्रप्रदेशातील तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र बालाजी मंदिर परिसरात वाहनांमध्ये इतर देव-देवता, राजकीय नेते यांचा फोटो असल्यास प्रवेश नाकारला जात आहे. महाराष्ट्रातील बहुतांश वाहनांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो. अशा वाहनांना प्रवेश नाकारल्याचे अनेक व्हिडीओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते की, शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या वाहनांना आम्ही प्रवेश देत आहोत. मात्र, त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून अद्यापही महाराजांचा फोटो असलेल्या वाहनांना प्रवेश देण्यात येत नसल्याचे समोर आले आहे.

अक्षय बोऱ्हाडे या भाविकाने एक व्हिडीओ बनवला आहे. त्यामध्ये त्याने गाडीत शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने मंदिर प्रशासनाने प्रवेश नाकारल्याचे तो सांगत आहे. ज्या गाड्यांवर शिवाजी महाराजांचे फोटो किंवा मूर्ती आहेत त्यावर त्या देवस्थानचे स्टिकर विकत घेऊन चिकटवण्यास सांगण्यात येत असल्याचेही त्याने सांगितले आहे.

तेथील चेक पोस्टवरील एका कर्मचाऱ्याला विचारले असता, दुसऱ्या कोणत्याही देवीदेवतांचे फोटो नेण्यास बंदी असल्याचं त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायला गेल्यावर चर्चा करत असताना कॅमेरा हिसकावून घेतल्याचा आरोप बोऱ्हाडे यांनी केला आहे. इथे खूप भयंकर प्रकार असल्याचे तो सांगतो. या प्रकरणात आता राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करून तिरूपती आणि आंध्रप्रदेश सरकारला शिवाजी महाराजांचा फोटो, मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश द्यावा अशी मागणी करण्याची विनंती नागरिकांकडून होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Gunaratna Sadavarte : बाळासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? सदावर्तेंचा थेट इशारा, १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम

2026-09-06 22:35:31

Gunaratna Sadavarte : बाळासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? सदावर्तेंचा थेट इशारा, १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम

विशेष : रयतेचा राजा

2026-02-19 05:00:08

विशेष : रयतेचा राजा

Bhagat Singh Koshyari : पुरस्कार की जखमेवर मीठ? कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच राजकारण तापलं; 'या' जुन्या वक्तव्यांचा भडका

2026-01-26 23:05:21

Bhagat Singh Koshyari : पुरस्कार की जखमेवर मीठ? कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच राजकारण तापलं; 'या' जुन्या वक्तव्यांचा भडका

पुण्यात नवा विश्वविक्रम! शेकोटीच्या उबेत ४ हजार ६२३ लोकांनी ऐकल्या शिवरायांच्या शौर्यगाथा

2025-11-16 06:45:14

पुण्यात नवा विश्वविक्रम! शेकोटीच्या उबेत ४ हजार ६२३ लोकांनी ऐकल्या शिवरायांच्या शौर्यगाथा

Sanjay Raut : शिवाजी महाराज अन् बाजीराव पेशवे मांसाहार करायचे; फडणवीस महाराष्ट्राला नामर्द बनवताहेत, संजय राऊतांचा हल्लाबोल

2025-08-13 11:39:02

Sanjay Raut : शिवाजी महाराज अन् बाजीराव पेशवे मांसाहार करायचे; फडणवीस महाराष्ट्राला नामर्द बनवताहेत, संजय राऊतांचा हल्लाबोल