Vehicle Sales: व्यापार युद्धाचा परिणाम कमी करण्यासाठी जीएसटी परिषदेने सप्टेंबरमध्ये जीएसटी दर कपात केली. याच कारणामुळे रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी व्याजदरात बरीच कपात केली. यामुळे देशातील वाहन कंपन्यांनी वितरकांना विकलेल्या वाहन विक्रीत म्हणजे घाऊक वाहन विक्रीत तब्बल 10.4% वाढ होऊन 2.83 कोटी युनिट इतकी विक्रमी झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार या अगोदरच्या वर्षात म्हणजे 2024-25 मध्ये एकूण वाहन विक्री 2.56 कोटी इतकी होती. यावर्षी प्रवासी व्यावसायिक वाहन विक्रीबरोबरच दुचाकी आणि तीन चाकी वाहनाच्या विक्री भरघोस वाढ झाली. या संघटनेचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी सांगितले की 2025- 26 मध्ये प्रवासी वाहन विक्री 7.9 टक्क्यांनी वाढून 46.43 लाख युनिट झाली, जीकी त्या अगोदरच्या वर्षात 43.01 लाख युनिट होती. आर्थिक वर्ष 2026 मध्ये दुचाकी विक्री 10.7% वाढून 2.17 कोटी झाली आहे. जीकी अगोदरच्या वर्षी 1.96 कोटी होती. हेही वाचा – गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरवली; गोल्ड ईटीएफमध्ये 31,561 कोटी रुपयाची गुंतवणूक यावर्षी मोटरसायकल विक्री 6.6% वाढून 1.30 कोटी झाली आहे. या अगोदरच्या वर्षात ही संख्या 1.22 कोटी इतकी होती. स्कूटर विक्री 18.5 टक्क्यांनी वाढून 81.17 लाख युनिट झाली. या अगोदरच्या वर्षात ही संख्या 68.63 लाख युनिट होती. आर्थिक वर्ष 2026 मध्ये व्यावसायिक वाहन विक्री 12.6% वाढून 10.79 लाख युनिट झाली आहे. अगोदरच्या वर्षात ही संख्या 9.58 लाख युनिट होती. ‘या’ तारखेपासून इंधन होणार महाग! डिझेल विक्रीत कंपन्यांना प्रति लिटर 35 तर पेट्रोलमध्ये 18 रुपयाचा तोटा आगामी वर्षांवर युद्धाचा परिणाम शक्य – 2025-26 या वर्षात एकूण वाहन विक्री विक्रमी झाली आहे. मात्र युद्धामुळे इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. महागाई वाढण्याची शक्यता आहे. व्याजदरही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आगामी वर्षात वाहन विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता वाहन उत्पादकाच्या संघटनेने सूचित केली.