आम आदमीच्या थाळीतून भाजी, दाळ-भात गायब, हा कसला विकसित भारत? – मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी मोदी सरकारच्या कार्यकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दाखला देत केंद्रावर टीका केली आहे. ज्या देशात सामान्य माणूस महागाईने त्रस्त आहे, हा कसला “विकसित भारत” आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये, खर्गे यांनी महागाईचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी दूध, कांदा, टोमॅटो आणि साखर यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या २०१४च्या किंमतींची त्यांच्या सध्याच्या किमतींशी तुलना करणारा व्हिडिओ शेअर केला.
महँगाई-nomics
ये कैसा “विकसित भारत”…?
जहाँ भाजपाई लूट को प्राप्त है महारत !! pic.twitter.com/oOAg4yTqoR
— Mallikarjun Kharge (@kharge) December 17, 2023
हे मेहंगाई नॉमिक्स असून त्यात लोकांना लुटण्याचे भाजपला मोठे कौशल्या प्राप्त आहे असे खर्गे यांनी म्हटले आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारीबद्दल कॉंग्रेसकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. पण त्यावर भाजपकडून कोणतेही समर्पक उत्तर दिले जात नाही असा कॉंग्रेसजनांचा आक्षेप आहे.



