#Video : वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
Updated On:

पुणे जिल्हा (वाघळवाडी प्रतिनिधी) : वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, धरणांचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. वीर धरण 93 टक्के भरल्याची माहिती सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.
दरम्यान, वीर धरणातून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून नीरा नदी काठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.





