धक्कादायक ! नायगावमध्ये 7 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या कँटिनमध्ये लैंगिक अत्याचार

वसई : बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर शाळेच्या सफाई कामगाराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता वसईतील नायगावमधून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. नायगावमधल्या एका नामांकित शाळेच्या कँटिनमध्ये काम करणाऱ्या 16 वर्षांच्या मुलाने 7 वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे चार ते पाच वेळा त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित मुलगी या शाळेत दुसर्या इयत्तेत शिकते. 22 ऑगस्टला शाळेतील सर्व मुलं कँटिनमध्ये गेली. पण पीडित मुलगी कँटनमध्ये जाण्यास घाबरत होती. याबाबत शिक्षिकेन तिला विचारले असता कँटिनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो असं तिने शिक्षिकेला सांगितले. यामुळे हादरलेल्या शिक्षकेने हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला. त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन नेमके काय झाले विचारले.
यानंतर पीडित मुलीने गेल्या 15 दिवसांपासून शाळेच्या आवारात उपहारगृह (कॅंटीन) मध्ये काम करणारा16 वर्षांचा मुलगा लैंगिक अत्याचार करत असल्याचं तिनं मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सांगितलं. विशेष म्हणजे एकदा मुलीने आपल्या घरी देखील याची माहिती दिली होती. पण घरच्यांनी तिचं म्हणणं गांभिर्याने घेतलं नाही. यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी याची माहिती नायगाव पोलिसांना दिली. या प्रकरणाची माहिती मिळातीच पोलिसांनी आरोपी मुलाला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक केली.





