वरुण धवन आणि पूजा हेगडे भक्तीत दंग; ऋषिकेशमध्ये केली गंगा आरती

Varun Dhawan And Pooja Hegde | बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री पूजा हेगडे ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या दोघेही आपल्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.
सध्या त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण गंगा नगरी ऋषिकेशमध्ये सुरू झालं आहे. शुटींगपूर्वी वरुण आणि पूजा यांनी ऋषिकेशमध्ये गंगा मातेचे आशीर्वाद घेतले आणि तसेच दोघांनी मिळून गंगा आरतीही केली. वरुण आणि पूजा हेगडे यांनी सोशल मीडियावर याचे फोटो पोस्ट करत माहिती दिली.
वरूण धवनने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “ऋषिकेशमधील आमच्या शेड्यूलची सुरुवात छान झाली, धन्य…” असं म्हणत त्याने भावना व्यक्त केली. तसेच शुक्रवारी दोन्ही कलाकार परमार्थ निकेतन आश्रमात पोहोचले होते.
View this post on Instagram
यादरम्यान, दोघांनीही गंगा आरतीत भाग घेतला आणि गंगा मातेची आरती केली. यावेळी वरुण पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसला, तर पूजा सलवार सूटमध्ये होती. गंगा आरती करण्यासोबतच दोघांनीही परमार्थ निकेतनच्या आवारात रुद्राक्षाचे रोप लावले. तसेच वरुण धवन आणि पूजा हेगडेने आश्रमातील मुलांशी संवाद साधला.
वरुण आणि पूजाचा हा चित्रपट वरुणचे वडील आणि लोकप्रिय दिग्दर्शक डेव्हिड धवन दिग्दर्शित करत आहेत. मृणाल ठाकूर, मनीष पॉल, कुब्रा सैत आणि नितीश निर्मल हे देखील चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. Varun Dhawan And Pooja Hegde |
हेही वाचा:





