तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – येथील शाळा चौकातील विठ्ठल मंदिरात तुकाराम बीजेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, त्यांच्या पत्नी रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते श्री विठ्ठल, रुक्मिणीची पूजा करण्यात आली. या वेळी काकड आरती, भजन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम झाले. या वेळी कालापिनीनिर्मित स्वरसंपदा विद्यालय प्रस्तुत नवविधा भक्ती या विषयावर “ऐशी भक्तीची आवडी” या संगीतमय कार्यक्रमास भाविकांनी व श्रोतेवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये डॉ. मीनल कुलकर्णी, प्राची गुप्ते, संपदा थिटे, संपदा ओखदे, आरती जाधव, प्राची पांडे, मंगेश राजहंस, प्रदीप जोशी, गोरख कोकाटे, योगीराज राजहंस, केदार अभ्यंकर आदींनी सहभाग घेतला. या वेळी कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, उपाध्यक्ष अशोक बकरे, यतीन शहा, बाळकृष्ण आरडे, अतुल देशपांडे, डॉ. शालिग्राम भंडारी, एड. श्रीराम कुबेर, छबुराव भेगडे, काशिनाथ निंबळे, महेश शहा आदी उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.