इंदापूर : इंदापूर पंचायत समिती व मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने वंदे मातरम सार्थ शताब्दी दिनानिमित्त शुक्रवारी (दि. ७) विविध कार्यक्रम घेण्यात आले. शताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. इंदापूर तालुका क्रीडा संकुलात हा कार्यक्रम झाला. तहसीलदार जीवन बनसोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ या गीताची रचना व तिचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व विषयावर व्याख्यान मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. किरण म्हेत्रे, यांचे ‘वंदे मातरम्’ या गीताची रचना व तिचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व या विषयावर व्याख्यान झाले. नारायणदास रामदास हायस्कूलच्या वतीने वंदे मातरम् ही एकांकिका सादर करण्यात आली. तर तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते शताब्दीनिमित्त आयोजित वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.