पिंपरी | रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

पिंपरी, (प्रतिनिधी) – भोसरी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी माजी नगरसेवक रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १५ ऑगस्ट रोजी युवा नेते आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बिनविरोध माजी नगरसेवक रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, सुलभा उबाळे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेवक वसंत बोराटे,
विलास मडेगिरी, पि्रयांका बारसे, संगीता ताम्हाणे, विक्रांत लांडे, मयूर कलाटे, सीमा सावळे, यश साने, संजय वाबळे, आतिष बारणे, रुपाली आल्हाट, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, तुषार सहाणे, धनंजय आल्हाट, राहुल गवळी, उल्हास शेट्टी, राजेश पिल्ले, विकास साने, जितेंद्र यादव यांच्यासह सर्वच राजकीय पक्षातील नेते उपस्िथत होते.
या वेळी फक्त भोसरी विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामधून मोठा मित्र परिवार उपस्थित होता. यावेळी खास करून पिंपरी चिंचवड महापालिका मधील नवीन समाविष्ट गावामधील तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी तरुणांनी मित्र दमदार भावी आमदार… बदल घडणार आणि रवी भाऊ लांडगेच घडवणार… अशी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिनियर प्रॉपर्टीचे सर्वेसर्वा संदीप लोखंडे. गणेश काळे. लक्ष्मीकांत रासकर, ॲड सिध्देश्वर बनसोडे, प्रवीण लांडगे, विशाल कवडे आणि रवी भाऊ लांडगे मित्र परिवार यांनी प्रयत्न केले.





