पुणे -महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध संस्था, संघटना, व्यक्ती यांच्याकडून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
महात्मा फुले यांना वंदन
महात्मा फुले मंडळ आणि ज्योती मित्र मंडळ यांच्यावतीने महापालिकेतील महात्मा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. याशिवाय शेती महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी ठिकाणच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी हनुमंत टिळेकर, शिवराज जांभुळकर, सुधीर पैठणकर, दिलीप राऊत, प्रशांत एकतपुरे, शारदा लडकत आदी उपस्थित होते.
“झोपडपट्टी सुरक्षा दला’कडून अभिवादन
गंजपेठेतील महात्मा फुले वाडा येथे “झोपडपट्टी सुरक्षा दला’चे अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुरेखा भालेराव, सुरेश धिवार. सुनील भिसे, डॉ. रोहित गडकरी, संतोष कदम, वंदना पवार आदी उपस्थित होते.
सकट संस्थेतर्फे उद्देशिकेचे सामूहिक वाचन
स्व. जगन्नाथ सकट समाज सेवा संस्थेच्या वतीने उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून आणि त्याचे नागरिकांना वाटप करून म. फुले यांना आदरांजली वाहण्यात आली. डीसीएम सोसायटीचे सचिव विशाल शेवाळे आणि ऍड. राहील मलिक यांच्या हस्ते समताभूमी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी इंद्रजित सकट, नुरुद्दीन सोमजी, डॉ. वैष्णवी किराड, प्रा. मयूर गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी शाखेचा सहभाग
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे कॅन्टोन्मेंट शाखेच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हनुमंत मिसाले, महेंद्र कांबळे, विनोद शेडगे, शुभम माने आदी उपस्थित होते.
एमआयएमकडून समताभूमीत अभिवादन
एमआयएम पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष शाहीद शेख यांच्या हस्ते समताभूमी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहर कार्याध्यक्ष निनाद धेंडे, मुबिन खान, शाबिर शेख, मौलाना शाहरुख, त्रिशला गायकवाड आदी उपस्थित होते.
भाजप झोपडपट्टी आघाडीतर्फे उपक्रम
भाजप झोपडपट्टी आघाडीच्या वतीने समताभूमी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला आघाडीचे अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजेंद्र शहा, अमित शहा, नझिर शेख, गौतम बनसोडे, महेश जोशी, सचिन खंडागळे आदी उपस्थित होते.
“दलित पॅंथरकडून अभिवादन
“दलित पॅंथर ऑफ इंडिया’च्या वतीने महात्मा फुले अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी समताभूमी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष इलियाज शेख, शाहरूख पठाण, जावेद शेख, साहिल तांबोळी, सागर भालेराव उपस्थित होते.
महात्मा फुलेंच्या प्रतिमेस नमन
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या वतीने महात्मा फुले यांना आदरांजली वाहण्यात आली. विभागाच्या अध्यक्षा राधिका मखामले यांनी म. फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी कल्पना उनवणे, प्रमिला भागवत, आरती व्हावळ आदी उपस्थित होते.