दरम्यान, या भेटीच्या अगदी आधी, रशियाने भारतासोबतचे धोरणात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले. रशियन संसदेने भारतासोबतच्या एका महत्त्वपूर्ण संरक्षण कराराला, रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट (RELOS) मान्यता दिली. या करारामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांना एकमेकांच्या लष्करी तळांचा आणि लॉजिस्टिक्स सुविधांचा वापर सुलभ होईल, संयुक्त ऑपरेशन्स, युद्धाभ्यास आणि आपत्ती परिस्थितीत सहकार्यासाठी त्यांची क्षमता वाढेल.
\nभारत दौऱ्याविषयी बोलताना क्रेमलिनने,”यामुळे भारत आणि रशियामधील “विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी” आणखी दृढ होईल ” असे म्हटले आहे. त्यांच्या दोन दिवसांच्या वास्तव्यादरम्यान, पुतिन २३ व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेत देखील सहभागी होतील, ज्याठिकाणी संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नवीन घोषणा अपेक्षित आहेत.
\nvaranasi putin aarti।