सातारा | वरकुटे मलवडी-शिरताव रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अखेर पूर्णत्वाकडे

वरकुटे मलवडी – माण तालुक्यातील वरकुटे मलवडी ते शिरताव रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बऱ्याच वर्षांपासून वंचित राहिले होते. परंतु, त्या रुंदीकरणाच्या कामाची अखेर पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून वंचित असणारा रस्ता रूंदीकरणाचे काम पूर्ण होत आहे.
बऱ्याच वर्षांपासून या रस्त्यावर दोन चाकी व चार चाकी वाहनांसाठी रस्त्यावरून खाली उतरण्यास जीवावरची कसरत करावी लागत असे. त्यामुळे चालकांना डोळ्यात तेल घालून रस्त्यावरून जावे लागत होते. या रस्त्याने अनेकांचे जीव गमावले आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे
हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा अशी मागणी करत जनतेकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता .परंतु, शासनाने त्याकडे कानाडोळा केला होता. शेवटी शासनाला जाग आल्यामुळे वरकुटे मलवडी ते शिरताव या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. ये – जा करण्यात येणारी वाहतूक सुरळीतपणे वाहनांना करता यावी असा रस्ता निर्माण करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे.





