Vande Bharat Sleeper Train। वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी,”देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये किरकोळ सुधारणा सुरू आहेत. या सुधारणांनंतर (रेट्रोफिटिंग) ही ट्रेन डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रेल्वे मंत्र्यांनी याविषयी बोलताना,”पहिल्या ट्रेनच्या चाचणी दरम्यान, काही किरकोळ समस्या आढळून आल्या, विशेषतः बोगी आणि सीटमध्ये समस्या होत्या. त्या दूर केल्या जात आहेत” असे सांगितले. पुढे ते म्हणाले, “आम्ही शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाही. एक उत्तम ट्रेन बनवून प्रवाशांसाठी आमचा प्रवास आरामदायी बनवण्याचे आमचे ध्येय आहे.” चाचणी रननंतर बोगी आणि सीटमध्ये कोणते बदल केले ? Vande Bharat Sleeper Train। * आपत्कालीन अलार्म बटण प्रवासी ते सहजपणे दाबू शकतील. * एसी डक्ट चांगल्या ठिकाणी हलवले जात आहे. * आग रोखण्यासाठी विशेष केबल्स आणि आर्क फॉल्ट डिटेक्शन डिव्हाइस बसवले जात आहेत. * सीसीटीव्हीसाठी अग्निरोधक केबल्स * युरोपियन सुरक्षा मानकांची तृतीय पक्षीय तपासणी (EN 45545 आणि EN 15227) लाँच अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले Vande Bharat Sleeper Train। वंदे भारत स्लीपर ट्रेनचे लाँचिंग यापूर्वी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले होते. सुरुवातीला, 15 ऑक्टोबर ही लाँचिंगची तारीख होती, परंतु आता डिसेंबरमध्ये ही ट्रेन रुळांवर धावेल हे निश्चित झाले आहे. BEML सध्या 10 स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार करत आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याच्या मते, पहिली ट्रेन एक प्रोटोटाइप होती, म्हणून तिची प्रत्येक पॅरामीटरवर व्यापक चाचणी घेण्यात आली. आता, ट्रेनमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी सुचवलेले सर्व बदल केले जात आहेत. रेल्वेचा असा दावा आहे की, सुरक्षितता आणि आरामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. म्हणूनच संपूर्ण ट्रेनची पुनर्रचना केली जात आहे, अगदी किरकोळ बदलांसाठीही. प्रवासी आता त्याच्या लाँचची आतुरतेने वाट पाहत आहेत. एकदा ट्रेन सुरू झाली की, लांब पल्ल्याचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी आणि सुरक्षित होईल. वंदे भारत ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील प्रकल्पांपैकी एक आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन BEML द्वारे उत्पादित केली जाते. हे १६० किमी/ताशी वेगासाठी डिझाइन केलेले आहे आणि त्याची चाचणी १८० किमी/ताशी वेगाने करण्यात आली आहे.