Vande Bharat Express : मुंबई-गोवा ‘वंदे भारत’चे उद्या लोकार्पण,PM Modi दाखवणार हिरवा कंदील

मुंबई – कोकण रेल्वे मार्गावर लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. उद्या म्हणजेच 27 जून 2023 रोजी मडगाव येथे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवणार आहेत. कोकणात होणारा पाऊस पाहता सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून केवळ तीन वेळा धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पावसाळा संपला की वंदे भारतचे वेळापत्रकात बद होऊन ट्रेन आठवड्यातून सहा वेळा धावेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही ट्रेन रविवारी बंद असेल.
ही एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबईहून, तर दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गोव्यावरुन धावेल.
ही ट्रेन सीएसएमटी स्टेशन, मुंबईवरुन सकाळी 5.32 वाजता सुटेल आणि मडगाव स्टेशनला दुपारी 3.30 वाजता पोहोचेल. तर परत येताना ही ट्रेन मडगावहून दुपारी 12.20 वाजता निघेल आणि मुंबईला रात्री 10.25 वाजता पोहोचेल. तर मान्सून गेल्यानंतर या ट्रेनचा वेग वाढवला जाईल आणि 586 किमी अंतर केवळ 7 तास 50 मिनिटांत कापेल. यादरम्यान ट्रेनला अकरा थांबे असतील.
सध्या कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेस ही वेगवान ट्रेन धावत आहे. ही ट्रेन 586 किमी अंतर 8 तास 50 मिनिटात पार करते. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांनाचा एक तास वाचणार आहे.





