तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला! सत्ता आल्यास मनोज जरांगे होणार मुख्यमंत्री
Updated On:

हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन दावे-प्रतिदावे आणि पक्षांतर्गत वाद रंगत असताना तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे.
काय म्हणाले राजरत्न आंबेडकर ?
राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात तिसऱ्या आघाडीला कितपत यश मिळतं आणि हा प्रस्ताव मनोज जरांगे स्वीकारतील का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. सध्या याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.





