वाल्मिक कराडच्या आयफोनचा डाटा रिकव्हर; नवं ‘घबाडं’ पोलिसांच्या हाती, केवळ पुण्यातच नाही तर…;एवढी संपत्ती आली कुठून?

बीडः सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मन विषन्न करणारे फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर या हत्या प्रकरणातील आरोपी हे माणसाच्या वेशातील सैतान असल्याचे बोलले गेले. या हत्या प्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचे समोर आले. यानंतर आता कराडविषयी आणखी एक नवी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी वाल्मिक कराड याची सगळ्या मालमत्तेची कसून चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. कराडकडे तीन आयफोन होते. त्यातील डिलीट केलेला डाटा एसआयटीच्या पथकाने तंत्रज्ञानाची मदत घेत रिकव्हर केला आहे. त्यानुसार आता पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती हाती लागली आहे. यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याअगोदरच वाल्मिक कराड याचे पुण्यातील मगरपट्टा आणि एफसी रोड येथे कोट्यावधींची मालमत्ता असल्याचे समोर आले होते. नव्या माहितीनुसार ही केवळ त्याची पुण्यातील संपत्ती असून त्याच्या राज्यात विविध ठिकाणी मालमत्ता आहेत. यासोबत वाल्मिक कराडकडे अनेक महागड्या गाड्याही असल्याची माहिती मिळत आहे. या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे.
कराड अॅपलचा शौकीन
वाल्मिक कराड हा अॅपल कंपनीच्या मोबाईलचा मोठा शौकील असल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे त्याच्याकडे अॅपल कंपनीचे एकूण तीन महागडे मोबाईल होते. ते सर्व मोबाईल पोलिसांनी कारवाईत हस्तगत केले आहेत. यातील गोल्डन रंगाचा अॅपल १६ प्रो हा मोबाईल कराड वापरत असे. याशिवाय गोल्डन रंगाचाच १३ प्रो आणि निळ्या फिकट रंगाचा १३ प्रो हा मोबाईल देखील त्याच्याकडे होता. यातील गोल्डन रंगाच्या १६ प्रो या मोबाईल फोनची किंमत तब्बल तीन लाखांच्या घरात आहेत. तसेच त्याच्याकडे महागड्या गाड्या असल्याचे देखील पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.
वाल्मिक कराडच्या महागड्या गाडे
फोर्ड इंडेव्हर MH-44/T-0700
अशोक लेलँड लि.(हायवा) MH-44/U-0700
जॅग्वार लैंड रोवर इंडिया MH-44/AC-0700
जेसीबी इंडिया लिमिटेड MH-44/S-7450
मर्सीडीझ बेन्झ इंडिया प्रा.ले. MH-44/Z-0007
बीएमडब्लु इंडिया प्रा. लि. MH-44/AC-1717
अशोक लंयलँड लि.(हायवा) MH-44/U-1600
सुदर्शन घुलेकडे असणाऱ्या महागड्या गाड्या
कंपनी – टोयोटो इनोवा गाडी क्र. ME-44/AB-1717
ट्रॅक्टर (महिंद्रा & महिंद्रा नि.) MH-44/D-4512
ट्रॅक्टर (महिंद्रा & महिंद्रा नि) MH-44/S-6973




