कराड शहरात वळिवाची जोरदार हजेरी
Updated On:

कराड (प्रतिनिधी) -कराड शहर व परिसरात रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर हवेत गारवा जाणवत होता.
एप्रिल महिन्यात कराड तालुक्यात अवकाळी पाऊस पडला होता. मात्र, शहराला पावसाने हुलकावणी दिली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक घरात असल्याने वाढत्या उष्णतेने हैराण झाले होते. उष्णतेमुळे सतत सुरू असणाऱ्या पंख्याची हवाही गरम येत होती. तर बाहेर फिरण्यास प्रशासनाकडून बंदी होती. त्यामुळे सर्वच नागरीक वैतागले होते.
अनेकवेळा ढगाळ वातावरण व्हायचे मात्र, पाऊस काही पडत नव्हता. गत पंधर दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने पाटण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले होते. मात्र, तालुक्याला हुलकावणी दिली होती. रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते.





