मुंबई : सध्या आयपीएलचा 18 वा सिझन जोरात सुरु आहे, या सिझनमध्ये आतपर्यंत अनेक चित्तथरारक सामने पाहायला मिळाले. या सिझनमध्ये सामन्यादरम्यानचे अनेक व्हिडिओ (Vaibhav Suryavanshi) व्हायरल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. यामध्ये खेळाडूंमधील वाद, मैत्री, आदर, एकमेकांना डिवचणे या व्हिडिओचा समावेश आहे. सध्या राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील सामन्यानंतरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात होत आहे. या व्हिडिओने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. काय आहे व्हिडिओमध्ये? 30 मार्च रोजी, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना पार पडला होता. या सामन्यानंतर सर्व खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) धोनीजवळ जाताच त्याने एक हृदयस्पर्शी हावभाव केला. प्रथम वैभव आणि धोनीने हँडशेक केले आणि नंतर वैभवने धोनीच्या पायांना स्पर्श केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Vaibhav Suryanshi Touches MS Dhoni’s feet That’s the level of respect MS Dhoni has earned ❤️🙏 pic.twitter.com/l8UXSOL0no — THaLa (@7_MSDthala) April 21, 2025 कोण आहे वैभव सूर्यवंशी ? 27 मार्च 2011 रोजी वैभवचा (Vaibhav Suryavanshi) बिहारमध्ये जन्म झाला. सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये स्थान मिळालेला तो खेळाडू आहे. त्याने जानेवारी 2024मध्ये बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्याचं वय 12 वर्ष 284 दिवस होतं. त्याने डेब्यूच्यावेळी विजय हजारे ट्रॉफी 2024-25 मध्ये बडोदाच्या विरोधात 42 चेंडूत 71 धावा ठोकल्या होत्या. तो लिस्ट-ए मध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात कमी वयातील भारतीय खेळाडू आहे. पदार्पणाच्या सामन्यात जिंकली सर्वांची मने वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये सर्वात तरुण खेळाडू म्हणून पदार्पण करणारा खेळाडू ठरला. पदार्पणाच्या सामन्यातच वैभवने दमदार खेळी खेळत सर्वानाच आश्चर्यचकित केलं. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू दुखापतीमुळे बाहेर पडला आणि याच्या जागेवर खेळण्यासाठी वैभवला संधी मिळाली. या संधीच सोनं करत सलामीला येऊन वैभवने त्याच्यावर संघाने ठेवलेला विश्वास खरा ठरवला. यशस्वी जयस्वाल सोबत सलामीला येऊन वैभवने 20 चेंडूत पाच चौकारांसह 34 धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने सामना केलेल्या पहिल्याच चेंडूवर डावखुऱ्या फलंदाजाने षटकार मारला होता. दोन्ही संघाची यंदाची कामगिरी ? राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघानी यावेळी खूप निराशाजनक कामगिरी केली आहे. या दोन्ही संघांचे सध्या प्ले ऑफ मध्ये पोहोचणे कठीण वाटत आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत आणि 6 सामने गमावले आहेत. तर चेन्नईनेदेखील आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत आणि 6 सामने गमावले आहेत. प्लेऑफसाठी शर्यत रंगली असून हे दोन्ही संघ संघर्ष करताना पाहायला मिळत आहे.