Vaibhav Suryavanshi Reaction Viral : रायझिंग आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान ए यांच्यातील रोमांचक सामना रविवारी खेळला गेला. दुर्दैवाने भारताला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, पण या सामन्यातून पुन्हा एकदा चर्चेत आला तो भारताचा १४ वर्षीय युवा सनसनाटी फलंदाज वैभव सूर्यवंशी! पहिल्या सामन्यातील शतकानंतर पुन्हा तुफान बॅटिंग आधीच पहिल्या सामन्यात धडाकेबाज शतक ठोकून सर्वांना थक्क करणाऱ्या वैभवने पाकिस्तानी गोलंदाजांनाही सोडले नाही. फक्त २८ चेंडूत त्याने ४५ धावांची झंझावाती खेळी केली. यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांवर निर्भयपणे हल्ला चढवत वैभवने चाहत्यांना पुन्हा आपल्या टॅलेंटची झलक दाखवली. सामन्यातील वाद मात्र सामन्यातील खरा व्हायरल क्षण होता तो वैभवचा भोळाभाळा चेहरा! पाकिस्तानच्या डावात १० व्या षटकात सुयश शर्माच्या पहिल्याच चेंडूवर माज सदाकतने मोठा फटका मारला. नमन धीरने तो अप्रतिम कॅच टिपला आणि भारतीय खेळाडूंनी जल्लोष सुरू केला. पण अंपायरने मात्र नॉट आऊटचा निर्णय दिला. यावर भारतीय कॅप्टन जितेश शर्मा संतापला आणि अंपायरशी जोरदार वाद घातला. This whole team looks like a full gang of gundas… And What is vaibhav surya vamshi doing man😂 pic.twitter.com/gIlGo6zKkk — Bhai with Opinions (@BhushanManmath) November 17, 2025 मैदानावर बराच वेळ गोंधळ उडाला. या सगळ्या प्रसंगादरम्यान रिॲक्शन कॅमेऱ्यात कैद झाला तो वैभव सूर्यवंशीचा चेहरा! फक्त १४ वर्षांचा वैभव इतक्या तणावाच्या वातावरणातही पूर्णपणे भोळासा, गोंधळलेला आणि मासूम दिसत होता. त्याच्या त्या निरागस प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहते म्हणतायत, “हा मुलगा क्रिकेटचा भविष्य तर आहेच, पण त्याचा हा मासूम चेहरा पाहून हसू थांबत नाही!” वयाने लहान असला तरी मैदानावर मोठा खेळ करणारा वैभव सूर्यवंशी नक्कीच भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. लवकरच तो सीनियर टीममध्ये दिसेल, असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे.