Vadgaon Maval : राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासह १६ नगरसेवकांनी अर्ज केले दाखल

वडगाव मावळ– वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १६ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली असून रविवारी (दि.१६) उमेदवारी अर्ज दाखल केले, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी शनिवारी (दि. १५) रात्री पत्रकार परिषद घेत उमेदवारांची नावे जाहीर केली.
ही निवडणूक प्रथमच पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर लढविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. शहराचा विकास हाच दृष्टिकोन ठेवून उमेदवार निवडण्यात आले, असेही खांडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नगराध्यक्षपदासाठी अबोली मयूर ढोरे यांना संधी देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत प्रभारी गणेश ढोरे, दीपक हुलावळे, ज्येष्ठ नेते मंगेश ढोरे, बाळासाहेब ढोरे, सुनील चव्हाण, तुकाराम ढोरे, राजेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, दत्तात्रय कुडे, चंद्रकांत ढोरे, गंगाधर ढोरे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अबोली ढोरे, सुनीता कुडे आदी उपस्थित होते.
‘वडगावच्या सर्वांगीण विकासासाठी व मजबूत नेतृत्वासाठी ही उमेदवारांची यादी काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी पक्ष संघटना म्हणून आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत.’ – गणेश खांडगे, तालुकाध्यक्ष
प्रभागनिहाय उमेदवारांची जाहीर यादी
प्रभाग १ – पुनम विकी भोसले
प्रभाग २ – प्रवीण विठ्ठलराव ढोरे
प्रभाग ३ – भाऊसाहेब तुकाराम ढोरे
प्रभाग ४ – सुनिता राहूल ढोरे
प्रभाग ५ – वैशाली पंढरीनाथ ढोरे
प्रभाग ६ – मयूर प्रकाश ढोरे
प्रभाग ७ – अजय महेंद्र भवार
प्रभाग ८ – माया अमर चव्हाण
प्रभाग १० – आकांक्षा योगेश वाघवले
प्रभाग ११ – सुनील गणेश ढोरे
प्रभाग १२ – गणेश सोपान म्हाळसकर
प्रभाग १३ – अजय बाळासाहेब म्हाळसकर
प्रभाग १४ – वैशाली गौतम सोनवणे
प्रभाग १५ – राजेंद्र विठ्ठलराव कुडे
प्रभाग १६ – मिनाक्षी गणेश ढोरे
प्रभाग १७ – अर्चना ज्ञानेश्वर ढोरे





