नवी दिल्ली – १२ नोव्हेंबरची पहाट, सूर्याचं डोकं नुकतंच वर येत होतं, हाडं गोठवणाऱ्या थंडीत उत्तरकाशीत कामगार बोगदा खणण्याचे काम करत होते. मात्र त्याचवेळी बोगद्याचा काही भाग कोसळला आणि अवाढव्य बोगदा (Tunnel) निर्माण करणारे शिल्पकार त्यात अडकले. या कामगारांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश आतूर झाला होता. या घटनेला मंगळवारी १७ दिवस झाल्यानंतर प्रचंड कष्ट, अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने अखेर अडकलेल्या सर्व ४१ कामगारांची सुटका करण्यात आली आहे. (Uttarkashi tunnel Rescue) यासह कामगारांच्या कुटुंबीयांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. (workers returned safely) उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh dhami) यांनी वाचविण्यात आलेल्या कामगारांशी याप्रसंगी संवाद साधला. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग हेही घटनास्थळी उपस्थित होते. बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ), नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएचआयडीसीएल), जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी होते. अशा प्रकारे झाले रेस्क्यू राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनन म्हणाले यांनी यावेळी सांगितले की, खोदकाम पूर्ण झाल्यानंतर पाइपपर्यंत बोगद्यात रॅम्प तयार केला गेला. रॅम्प बनवण्यात काही अडचण आल्यास शिडीचाही पर्याय आम्ही ठेवला होता. याद्वारे कामगारांपर्यंत पाइपद्वारे पोहोचल्यावर त्यांना स्ट्रेचरवर झोपवले गेले आणि दोरीच्या साहाय्याने ओढून बाहेर काढण्यात आले जाईल. अशाप्रकारे एका कामगाराला बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी ३ ते ३ मिनिटे लागले. अशाचप्रकारे सर्वांना बाहेर काढण्यात आले. बोगद्याच्या आत बांधले रुग्णालय रुग्णवाहिकेशिवाय बोगद्याच्या आत स्ट्रेचर आणि गाद्या पोहोचवण्यात आल्या. तेथेच रुग्णालय बांधण्यात आले. बचावकार्यानंतर कामगारांना प्रथमोपचारासाठी येथे ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांना ३०-३५ किमी दूर असलेल्या चिन्यालिसौर येथे नेले जाईल. जेथे ४१ खाटांचे विशेष रुग्णालय बांधण्यात आले आहे. जर कोणत्याही मजुराची प्रकृती बिघडली, तर त्याला तत्काळ एअरलिफ्ट करून एम्स ऋषिकेशमध्ये पाठवले जाणार आहे. तसेच, चिन्यालीसौर विमानतळावर चिनूक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे.