उत्तरप्रदेशातील 1 हजार 700 जनधन खाती रडारवर

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 700 जनधन बॅंक खाती निवडणूक आयोगाच्या रडारवर आली आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात त्या खात्यांमध्ये संशयास्पदरित्या ठेवी जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित खात्यांमध्ये मागील काही दिवसांत प्रत्येकी 10 हजार रूपये याप्रमाणे तब्बल 1 कोटी 70 लाख रूपये जमा झाले. मतदारांना लाच देण्याच्या इराद्यातून राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून त्या रकमा जमा करण्यात आल्या असाव्यात, असा संशय बळावला आहे. त्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने चौकशी हाती घेतली आहे.

निवडणूक आयोगानेही संबंधित बॅंकेकडून अहवाल मागवला आहे. आयोगाने 10 मार्चला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. काळा पैसा आणि मतदारांना लाच देण्याचे प्रकार रोखण्यासाठी आयोगाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.