World Heart Day 2026: ‘Use Heart For Action’! हृदयाच्या आरोग्यासाठी यंदा कृतीचा संकल्प करा; डॉ. ज्योत्स्ना पाटील काय म्हणतात?
World Heart Day 2026 हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी सर्वप्रथम नियमित आरोग्य तपासणीची सवय लावणे आवश्यक आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास किंवा धूम्रपानाची सवय असलेल्या व्यक्तींनी वेळोवेळी हृदयविकाराच्या जोखमीचे मूल्यमापन करून घ्यावे. योग्य वेळी करण्यात आलेल्या तपासण्या आणि वैद्यकीय सल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका ओळखण्यास मदत होते.

World Heart Day 2026: मनुष्याच्या जन्मापासून, किंबहुना जन्मापूर्वीपासून अविरत कार्यरत असणारा अवयव म्हणजे हृदय. मात्र, आधुनिक जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, मद्यपान, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि धूम्रपान यांसारख्या कारणांमुळे हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे केवळ हृदयविकाराविषयी माहिती असणे पुरेसे नसून, योग्य वेळी योग्य कृती करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या जागतिक हृदयरोग दिनाचा संदेश ‘Use Heart For Action’ असा असून, हृदयाच्या आरोग्यासाठी कृती करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी सर्वप्रथम नियमित आरोग्य तपासणीची सवय लावणे आवश्यक आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास किंवा धूम्रपानाची सवय असलेल्या व्यक्तींनी वेळोवेळी हृदयविकाराच्या जोखमीचे मूल्यमापन करून घ्यावे. योग्य वेळी करण्यात आलेल्या तपासण्या आणि वैद्यकीय सल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका ओळखण्यास मदत होते.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
छातीमध्ये दडपण येणे किंवा दुखणे, चालताना अथवा श्रम करताना धाप लागणे, असामान्य थकवा जाणवणे, चक्कर येणे, घाम येणे, डावा खांदा, हात किंवा पाठ दुखणे तसेच वेदना जबड्याकडे जाणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे हृदयविकाराशी संबंधित असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे जाणवल्यास वेळ न घालवता वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.
प्रतिबंध हीच खरी कृती
हृदयविकार झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच, तो होण्यापूर्वीच त्याचा धोका ओळखणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे अधिक महत्त्वाचे आहे. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळल्यानंतर अनेकदा रुग्णांच्या मनात पहिला विचार अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा येतो. काही रुग्णांमध्ये या प्रक्रिया अत्यावश्यक आणि जीव वाचवणाऱ्या ठरू शकतात. मात्र, प्रत्येक रुग्णाची परिस्थिती सारखी नसते आणि प्रत्येक ब्लॉकेजसाठी एकच उपचारपद्धती लागू होत नाही.
ब्लॉकेजचे प्रमाण, त्याचे ठिकाण, लक्षणांची तीव्रता, हृदयाची कार्यक्षमता, इतर आजार, वय आणि एकूण वैद्यकीय स्थिती यांचा विचार करून उपचारांचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. अँजिओप्लास्टी किंवा बायपासची गरज प्रत्येक रुग्णासाठी सारखीच नसते. त्यामुळे रुग्णाची अवस्था आणि जोखमीचे घटक लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार ठरवणे आवश्यक आहे.
काही निवडक रुग्णांमध्ये, विशेषतः ज्यांना शस्त्रक्रियेची किंवा अन्य हस्तक्षेपात्मक उपचारांची आवश्यकता नसते, ज्यांच्यासाठी सध्या शस्त्रक्रिया योग्य नसते किंवा शस्त्रक्रियेनंतरही दम लागणे, छातीत वेदना होणे यांसारखी लक्षणे कायम राहतात, अशा परिस्थितीत काही विनाशस्त्रक्रिया उपचारपद्धतींचा वैद्यकीय सल्ल्यानुसार विचार केला जाऊ शकतो. काही रुग्ण शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य नसतात, तर काहींना शस्त्रक्रियेची भीती वाटते. अशा रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक हृदयविकार उपचार कार्यक्रम उपयुक्त ठरू शकतात.

World Heart Day 2026
विनाशस्त्रक्रिया उपचारपद्धतींचा पर्याय
पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये रुग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीनुसार प्रतिबंधात्मक हृदयविकार उपचारांचे नियोजन केले जाते. यामध्ये ईईसीपी (EECP), एसीटी (ACT), ईएसएमआर (ESMR), एचबीओटी (HBOT) यांसारख्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार दिले जातात. या उपचारांचा उपयोग, परिणामकारकता आणि रुग्णासाठी त्यांची योग्यता यांचा निर्णय तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जातो.
या उपचारांचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांना दैनंदिन कामकाज सांभाळत उपचार घेता येऊ शकतात. अनेक उपचार बाह्यरुग्ण विभागातून दिले जातात आणि त्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसू शकते. मात्र, उपचारांची पद्धत, कालावधी आणि रुग्णालयात दाखल होण्याची गरज ही रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार ठरते.
ज्या रुग्णांना अँजिओप्लास्टी किंवा बायपाससारख्या शस्त्रक्रिया टाळायच्या आहेत, ज्यांना शस्त्रक्रियेची भीती वाटते, जे वैद्यकीयदृष्ट्या शस्त्रक्रियेसाठी योग्य नाहीत, हृदयविकारामुळे ज्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागते किंवा शस्त्रक्रियेनंतरही ज्यांना अँजायना आणि दम लागण्यासारखी लक्षणे जाणवतात, अशा निवडक रुग्णांसाठी या उपचारपद्धतींचा विचार केला जाऊ शकतो.
पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना पाटील यांच्या माहितीनुसार, गेल्या १८ वर्षांपासून केंद्रामार्फत उपचारांबरोबरच आहार, व्यायाम, जीवनशैलीतील बदल आणि मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन यांचाही उपचार प्रक्रियेत समावेश केला जात आहे. यामुळे रुग्णांचे जीवनमान आणि आत्मविश्वास उंचावण्यास मदत होत असल्याचे दिसून येते. या उपचारप्रणालीमध्ये रुग्णाला दैनंदिन जीवनात सहजतेने सहभागी होता यावे आणि आजाराची जाणीव कमी व्हावी, यावरही भर दिला जातो.
हृदयाच्या आरोग्यासाठी कृतीचा संकल्प करूया
जागतिक हृदयरोग दिनानिमित्त आपण हृदयाकडे दुर्लक्ष करणार नाही, असा संकल्प करूया. हृदयाकडून मिळणारे इशारे वेळीच ओळखून योग्य तपासण्या, वैद्यकीय सल्ला आणि उपलब्ध प्रतिबंधात्मक उपचारांची मदत घेऊया. योग्य वेळी केलेल्या तपासण्या, वैद्यकीय सल्ला आणि उपचार आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
अँजिओप्लास्टी आणि बायपासची गरज प्रत्येक रुग्णासाठी सारखीच नसते. प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय अवस्था आणि जोखमीचे घटक लक्षात घेऊन उपचारांचे नियोजन केले जाते. त्यामुळे काही रुग्णांमध्ये विनाशस्त्रक्रिया उपचारपद्धती हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र, कोणतीही उपचारपद्धती निवडण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार, यंदा हृदयासाठी केवळ माहिती मिळवण्यापुरते मर्यादित न राहता योग्य वेळी योग्य कृती करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन डॉ. ज्योत्स्ना पाटील, संचालिका, पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर यांनी केले आहे.





