US Navy Fighter Jets Crash : अमेरिकेत एका एअर शो दरम्यान नौदलाच्या दोन विमानांची हवेतच धडक (US Navy Fighter Jets Crash) झाली. इदाहो प्रांतात विडबे आयलंड येथे माऊंटन होम एअर फोर्स बेसवर हा एअर शो आयोजित करण्यात आला होता. वॉशिंग्टनमधील अमेरिकेच्या नौदलाच्या इलेक्ट्रीक अटॅक स्कॉड्रन १२९ मधील ईए १८-जी ग्रॉलर्स बनावटीच्या विमानांमध्ये (US Navy Fighter Jets Crash) ही धडक झाली आणि दोन्ही विमाने कोसळली, असे नेव्हल एअर फोर्सेसच्या यूएस पॅसिफिक फ्लीटसाठीच्या प्रवक्त्या कमांडर एमिली मायेम यांनी सांगितले. हवा कसरतींची प्रात्यक्षिके सादर करत असताना ही दुर्घटना घडली. दोन्ही विमानातील एकूण ४ कर्मचाऱ्यांनी आपली सुखरुप सुटका करून घेतली आणि सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. या विमान अपघाताच्या कारणांचा तपास केला जात आहे, असे कमांडर मायेम म्हणाल्या. US Navy Fighter Jets Crash विमान दुर्घटना (US Navy Fighter Jets Crash) घडल्यानंतर लगेचच एअर फोर्सचा हा तळ बंद करण्यात आला. या घटनेनंतर उर्वरित एअर शो तात्काळ रद्दकरण्यात आला. दोन विमानांची धडक झाल्यानंतर चार पॅरेशूटधारक जमिनीवर उतरत असल्याचे प्रत्यक्ष साक्षीदारांनी सोशल मीडियावर पोस्टकेलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे. विमानांच्या कसरती आणि पॅरेशूट जंपिंगचा समावेश असलेला हा एअर शो विमान वाहतुकीचा इतिहास साजरा करण्यासाठी आणि आधुनिक लष्करी सामर्थ्याचे सादरीकरण करण्यासाठी आयोजित केला जातो, असे आयोजकांनी सांगितले.